संगमनेरात गोवंश जनावरांची कत्तल सुरूच; पोलिसांनी केले 1600 किलो गोमांस जप्त

संगमनेर – संगमनेरात पोलिसांनी 1600 किलो गोमांस जप्त केले  असून शहरात मोठया प्रमाणावर गोहत्या सुरूच असल्याचे  पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकत  मोटार गाडीसह  सुमारे3 लाख 70 हजारांचा मुद्देमाल  हस्तगत केला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .

रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास पोलिसांना  मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पुणे महामार्गावर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात  एक टोयाटो कार एम एच 02/ टी एच 0659 मध्ये 400 किलो गोमांस भरलेले मिळून आले.याप्रकरणी फैजल  जलील कुरेशी, अब्दुल करीम कुरेशी खालिद शेख, कासीम मोहम्मद कुरेशी, आसिफ शेख, तौसिफ शेख राहणार संगमनेर  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   तर शहरातील भारत नगर भागात रविवारी रात्री साडे बाराच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत यामध्ये 1200 किलो गोमांस जप्त केले आहे.

आरोपी नवाज कुरेशी यांच्या राहत्या घरामागील पत्र्याच्या वाड्यात हे गोमांस आढळून आले. याप्रकरणी नवाज जावेद कुरेशी व इतर दोन व्यक्तींवर गोवंश हत्याबंदी कायद्यांव्ये कारवाई करण्यात आली असून  पोलीस  पुढील तपास करत आहेत. सातत्याने कत्तलखान्यांवर चाललेल्या कारवाया आणि  गोहत्येचे सत्र कधी थांबणार. तसेच कायद्याचा धाक न उरलेल्या कत्तलखाण्याच्या चालकांवर मालकांवर कठोर कारवाई कधी होणार असा सवाल निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)