संगमनेरमध्ये स्वाइन फ्लूचा पाचवा बळी

निमोण येथील वृद्ध महिलेचा नाशकात मृत्यू

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूने डोकेवर काढले असून निमोण येथील 70 वर्षीय वृद्ध महिलेचा बुधवारी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वाइन फ्लूचा हा तालुक्‍यातील एका महिन्यातील पाचवा बळी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरासह तालुक्‍यात ग्रामीण भागात दुपारी उन रात्री गारवा अशा वातावरणामुळे सर्दी ताप खोकल्याची साथ सुरु आहे.  वृद्ध महिलेला 22 सप्टेंबरला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल केले. त्यांच्या वैद्यकीय अहवालात स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, उपचारा दरम्यान बुधवारी (दि.26) त्यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेने स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 झाली आहे.

या आजाराचे रुग्ण ठिकठिकाणी आढळत असल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. याबबत शहरासह तालुक्‍यातील खाजगी डॉक्‍टरांचा बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आहे. तसेच नागरिकांनाही घाबरून न जाता या आजाराचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)