संगमनेरमध्ये जलसाक्षरता अभियान राबविण्याचा निर्णय – तांबे

संगमनेर – पाणी हेच खऱ्या अर्थाने आपले जीवन आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे सजीव सृष्टीला धोका निर्माण झाला असून हवामानाचा लहरीपणा,दुष्काळ आदी समस्यांवर मात करण्यासाठी देश पातळीवर पाणी वाचविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. यावर्षापासून संगमनेरमध्ये जलसाक्षरता अभियान राबविण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेत पाणी बचत हिच पाणी निर्मीती ठरणार असल्याचे मत नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी व्यक्त केले.

जागतिक जलदिनी सह्याद्री विद्यालयात आयोजित पाणी वाचवा या कार्यक्रमात तांबे बोलत होत्या. बाबुराव गवांदे, प्राचार्य के. बी. शिंदे, मुख्याध्यापिका नम्रता पवार, अशोक गुंजाळ, नामदेव कहांडळ, सचिन गुंजाळ, रवी सोनवणे, पुष्पा कासार, मंगल देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पाणी बचतीची शपथ देण्यात आली.

तांबे म्हणाल्या, पुढील काळात पाण्याची बचत महत्वाची ठरणार आहे. पाण्याची बचत हीच नव्याने पुन्हा पाणी निर्मीती ठरेल. सध्या माणसाला निसर्ग निर्मीत पाणी, हवा याचे महत्व वाटत नाही. परंतु याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे दुष्काळी भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागते.  वाढती लोकसंख्या, पाण्याचा अपव्यय, नियोजनाचा अभाव, पाण्याचा अतिवापर या बाबतीत सर्वच स्तरावर जाणीव जागृतीची गरज असल्याचेही त्यांनी म्हंटल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)