संगमनेरमध्ये एकाच गल्लीत तीन घरफोड्या; मुद्देमाल लंपास

संगमनेर –शहरातील उपनगर भागात अतिशय दाट नागरीवस्ती असलेल्या इंदिरानगर गल्ली क्रमांक दोनमधील तीन बंद घरात घुसून अज्ञात चोरटयांनी चोरी केली. मंगळवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की इंदिरानगर येथील मनोज उपरे यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरटयांनी प्रवेश केला आणि कपाटातील 33 हजार रुपये रोख व साडेचार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी याच घराच्या जवळ असलेल्या शांताराम खांडरे व सुरेश दारोळे यांच्या बंद घराचे कडी,कोंडे तोडून प्रवेश केला; परंतु यातून किती मुद्देमाल चोरला गेला, याची माहिती अजून मिळू शकली नाही. संगमनेर शहर पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान, शहरात वारंवार होणाऱ्या चोरी व घरफोडीच्या घटना वाढत असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील कुंथुनाथ सोसायटीत झालेल्या घरफोडीचा तपास पोलीस करत असताना अशा प्रकारे घरफोड्या होणे म्हणजे पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)