संगमनेरमध्ये आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

भीतीपोटी दोन महिन्यांनंतर फिर्याद दाखल ः शिक्षकावर गुन्हा दाखल

संगमनेर – तालुक्‍यातील मामेखेल (जवळे बाळेश्‍वर) येथे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना 21 मार्च रोजी घडली. भीतीपोटी तिने दोन महिन्यानंतर याबाबत फिर्याद दिली.

मामेखेल येथे शासकीय आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात ही 17 वर्षीय आदिवासी विद्यार्थिनी शिकते. जयराम बबन गोडे (वय 30) या विज्ञान शिक्षकाने 21 मार्च 2018 रोजी तिला विज्ञान प्रकल्पाची फाईल घेऊन त्याच्या घरी बोलावले. येथे तोंडात रूमाल कोंबून या शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला.
22 मार्च रोजी सुट्टीसाठी घरी आल्यानंतर गोडे याने तिच्या मोबाइलवर दोन-तीन वेळा फोन केला. या वेळी त्याने घडल्या प्रकाराविषयी कोणालाही सांगू नको, अशी धमकी दिली. या मुलीने त्याचे संभाषण रेकॉर्ड केले. त्यानंतरही त्याने अनेकदा तिला फोन केला. 15 दिवसांपूर्वी दोन वेळा हा शिक्षक तिच्या घरी आला. मुलीचे वडील व भाऊ यांच्याशी त्याने गप्पा मारल्या. त्याच्याविषयी घरच्यांनी विचारल्यानंतर या मुलीने न राहवून झालेल्या प्रकाराविषयी सांगितले. यानंतर आई-वडील आणि भावाने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी जयराम गोडे यास अकोले तालुक्‍यातील तास पिंपळदरी येथून अटक केली. त्याच्यावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)