संगमनेरमध्ये अवैध वाळू वाहतूकची वाहने पकडली

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील पिंपारणे येथील देवनदीत बेकायदा डंपर व ट्रॅक्‍टरच्या साह्याने वाळूउपसा करणाऱ्या तीन वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिंपारणे येथील देवनदीला डंपर व ट्रॅक्‍टरच्या साह्याने वाळूउपसा होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून तहसीलदार साहेबराव सोनावणे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ नायब तहसीलदार अशोक रंधे यांना पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रंधे यांच्यासह मंडलाधिकारी महादेव घुगे, कामगार तलाठी विक्रम वतारे, बाबासाहेब नरवडे, बाळकृष्ण वैद्य आदींच्या पथकाने पिंपारणे शिवारातील देवनदी गाठली. त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा एक डंपर व दोन ट्रॅक्‍टर असे तीन वाहने आढळून आली. महसूलच्या पथकाने उत्तम राहिंज यांच्या मालकीचा डंपर, मुकेश काकड व शिवम गुंजाळ याच्या मालकीचे असे दोन ट्रॅक्‍टर आढळून आले. त्यानंतर पथकाने हे तीनही वाहने जप्त केली आहे. ताब्यात घेतलेल्या वाळूच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे. महसूलच्या या धडक कारवाईमुळे वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)