संगमनेरमध्ये अपंग प्रमाणपत्र शिबीर उत्साहात

संगमनेर – संगमनेर भाजपच्या दिव्यांग सेलच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेल्या अपंग प्रमाणपत्र शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

संगमनेर भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष विनायक दाभोळकर यांच्या पाठपुराव्यामुळे अपंग प्रमाणपत्र व अपंग साहित्य वाटप शिबीर कॉटेज हॉस्पिटल येथे मंगळवार दि.२४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत अनेक दिव्यांग व्यक्तींनी तपासणीसाठी गर्दी केली होती. वेगवेगळ्या अपंगत्वाकरिता स्वतंत्र डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आलेली होती. अपंगत्व तपासणीकरीता नगर येथून आलेले डॉ. तांदळे, डॉ. पाठक,डॉ. कराळे, डॉ. रासकर व डॉ.घोडके यांनी रुग्णांची तपासणी केली.

या शिबिरात अनेक दिव्यांग व्यक्ती अपंग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरल्या असून त्यांना पुढील तपासणीसाठी नगरलाजाण्याची वेळ ठरवून देण्यात आली आहे.सदर शिबीर आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष विनायक दाभोळकर, शहराध्यक्ष अनिल मालपाणी, सचिन सोनवणे, अरुण सोनवने व सुनिल खरे तसेच अपंग सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे यांनी प्रयत्न केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र सांगळेतालुका सरचिटणीस नानासाहेब खुळे, विकास गुळवे, शहर सरचिटणीस दिनेश सोमाणी व सुदाम ओझा, दीपक भगत, किशोर गुप्ता, शिरीष मुळे

भारत गवळी, दीपेशताटकर,अरुणकुलकर्णी, अरुण थिटमे, दिलीप रावल, राहुल भोईर, कल्पेश पोगुल, जग्गू शिंदे, सोमनाथ नेहे, ज्योती भोर, कांचन ढोरे, रेश्मा खांडरे,निर्मला थोरात, प्राजक्ता बागुल आदिंनी विशेष प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)