संगमनेरमधील रस्त्यांसाठी 26 कोटी मंजूर

बाळासाहेब थोरातांच्या प्रयत्नांना यश; ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे
संगमनेर – तालुक्‍यातील प्रत्येक गावासह वाडीवस्त्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या रस्त्यासाठी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. तालुक्‍यात सर्वंत्र रस्त्याचे जाळे निर्माण झाले असून नव्याने तालुक्‍यातील विविध रस्त्यांसाठी सुमारे 25 कोटी 59 लाख 15 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.
थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात सातत्याने रस्ते, वीज, आरोग्य, पाणी, सिमेंट बंधारे, सभामंडप अशी विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे संगमनेरच्या ग्रामीण विकासास मोठी चालना मिळाली असून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 50 ते हिवरगाव पठार साकूर ते प्रमुख जिल्हा मार्ग 23 या 11 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 4 कोटी 97 लाख रुपये, तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत नव्याने व दुरुस्तीसाठी जवळे कडलग ते डेरेवाडी हा या सात किलोमीटर रस्त्यासाठी दोन कोटी 70 लाख, जांबुत खुर्द ते जांबुत बुद्रुक या रस्त्यासाठी तीन कोटी 68 लाख, साकूर तास्करवाडी ते खंडेरायवाडी हा 5.1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी दोन कोटी 65 लाख 69 हजार, साकूर हिवरगाव पठार ते डोळासणे हा 5.4 किलोमीटरच्या रस्त्यासाठी दोन कोटी 89 लाख 80 हजार, निमगाव भोजापूर ते मालदाड रस्ता हा तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक कोटी 74 लाख 55 हजार, वडगाव पान ते पोखरी हवेली कुरण रस्ता या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक कोटी 49 लाख 60 हजार रुपये, निमोण ते सोनेवाडी रस्ता या तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक कोटी 48 लाख साठ हजार, बोटा आंबी दुमाला ते म्हसवंडी तालुका हद्द रस्ता या रस्त्यासाठी रस्त्यासाठी दोन कोटी 94 लाख 93 हजार, वडगाव पान, जोर्वे रोहम वस्ती ते रणखांबवाडी या दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी 98 लाख 49 हजार रुपये अशा 25 कोटी 59 लाख 15 हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
या सर्व कामांसाठी सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीच्या सदस्यांनी आ. थोरात यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. या नव्याने होणाऱ्या रस्त्यांमुळे ग्रामीण भागातील दळवळवळणाची सुविधा आणखी वाढणार आहे. या कामांना तातडीने सुरुवात होणार असल्याने सर्व भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)