संगमनेरमधील कर्पे यांच्या साईनाथ रुग्णालयाची मान्यता रद्द

संगमनेर – शहरातील निवासी क्षेत्रात सुरू असलेल्या डॉ. अमोल कर्पे यांच्या साईनाथ रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी ही कारवाई केली असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संगमनेरातील ही पहिलीच कारवाई असून, निवासी भागात रुग्णालय चालविणाऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे.
बॉम्बे नर्सिंग होम कायद्याचे उल्लंघन करणारे हे हॉस्पिटल जाणता राजा मैदानाकडे जाताना एका निवासी इमारतीत अलीकडेच सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयाला सुरुवातीपासूनच येथील नागरिकांनी विरोध केला होता. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील नागरिकांच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष केले होते. विजयकुमार फुलचंद कटारिया या एका नागरिकाने केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाडे यांनी यासाठी द्विसदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणी माहिती घेतली. समितीच्या चौकशी अहवालात कर्पे यांचे 25 बेडचे हॉस्पिटल बॉम्बे नर्सिंग कायद्याचे उल्लंघन करणारे आणि सादर नकाशा डावलून करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यातच हे रुग्णालय निवासी क्षेत्रात देखील असल्याचे पुढे आले. त्यामुळे या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली.

बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार नोंदणी करण्याबाबत शासनाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याच्या कारणावरून डॉ. अमोल कर्पे यांच्या साईनाथ रुग्णालयाला निगमित केलेले प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे यांनी रद्द केले. यानंतरही हे रुग्णालय सुरूच राहिले तर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव घोडके यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)