संगमनेरच्या विकासाचे समृद्ध वारसदार… (भाग दोन )

सहकार आणि संगमनेर या दोन शब्दांचा खऱ्या अर्थाने मिलाफ झाला असेल तर तो येथील समृध्दीत. एकेकाळी दुष्काळी आणि दंगलीचे शहर अशी राज्यात ओळख असलेले संगमनेर आज राज्याच्या सहकारात दिशादर्शक काम करत आहे. सहकाराचा पाया आणि त्या पायावर मिळालेली समृध्दता आज केवळ संगमनेरातच अनुभवण्यास मिळते. कॉम्रेड दत्ता देशमुख, माजी मंत्री बी. जे. खताळ, भाऊसाहेब थोरात या सहकारातील धुरंधरांच्या पावलावर पाऊल टाकत येथील सहकाराच्या विकासाचे खऱ्या अर्थाने आमदार बाळासाहेब थोरात समृध्द वारसदार ठरले आहेत.

उमेदवार निवडीचे अधिकार थोरात यांच्या नेतृत्वाखालील समितीला देण्यात आले. पंतप्रधान मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये थोरात यांना सोबत घेत पक्ष काय करिष्मा साधणार याबद्दल संगमनेरकरांनादेखील उत्सुकता होती. मात्र, गुजरातच्या निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर झाले तशी या नेतृत्वाने केलेली कामगिरीदेखील पक्ष नेतृत्वाच्या लक्षात येऊ लागली. त्यातूनच त्यांच्यावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत हिमाचल प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली. दिल्लीतील पक्षाच्या नेतृत्वाने थोरात यांना थेट पक्षीय पातळीवर दिल्लीत काम करण्याची संधी देत त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. कोणत्याही यशस्वी नेत्याला विरोध असणे साहजिकच आहे.

संगमनेरच्या विकासाचे समृद्ध वारसदार… (भाग एक)

संगमनेरातदेखील त्यांच्याविरोधात अन्य पक्षांकडून त्यांना बदनाम करण्याची संधी सोडली जात नाही. मात्र, तरीदेखील संगमनेरकर मतदार त्यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांना सातत्याने निवडून देत आले. एकप्रकारे ही येथील विरोधकांसाठी संगमनेरकरांनी दिलेली चपराक असली तरी थोरात यांना लोक निवडून देतात हेच विरोधक सोयीस्करपणे विसरताना दिसतात. संगमनेरात अमृत उद्योगसमूहाच्या कारभाराची धुरा थोरात यांच्याकडे आहे. या बळावर त्यांनी सर्वच पातळ्यांवर संगमनेरचा नावलौकिक वाढविला आहे. येथील सहकार, शिक्षण, अर्थव्यवस्था, शेती, बॅंकिंग याच्या जोरावर संगमनेरची राज्यातील सर्वात सुरक्षित शहर असे नवे समीकरण निर्माण केले. मोठा जनाधार असलेला हा नेता खऱ्या अर्थाने संगमनेरचा समृध्द वारसदार ठरला आहे.

नितीन शेळके

प्रतिनिधी, संगमनेर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)