संगमनेरच्या दोन गॅस वितरकांवर कारवाई

उज्ज्वल गॅस योजनेत पंतप्रधानांचा उल्लेख टाळला; स्थानिक आमदारांना महत्त्व
संगमनेर – प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजनेत नियमबाह्य बदल करीत संकेतभंग केल्याबद्दल संगमनेरच्या दोन गॅस वितरकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे शहर भाजपने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत उज्ज्वल गॅस योजनेत संकेतभंग करून पंतप्रधानांचा अवमान करण्यात आला. तालुक्‍यात ठिकठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजनेंतर्गत मोफत गॅस शेगडी व जोडणीचे वाटप चालू आहे. अशाच एका कार्यक्रमात एका वितरकाने स्थानिक नेते मंडळींना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते गॅस वाटप केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांचा फोटो व योजनेतील “प्रधानमंत्री’ हे नावच गायब करण्यात आले, तर दुसऱ्या कार्यक्रमात वितरकाने मोफत वाटप होत असलेल्या गॅस शेगडीवर स्थानिक आमदारांचे नाव टाकलेले स्टीकर व त्यांच्या संकल्पनेतून वाटप असे घोषवाक्‍य चिटकविले असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
या गैरप्रकाराची तक्रार भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी संगमनेर भाजप कार्यालयात पुराव्यासह केली. ही तक्रार भाजपचे संगमनेर शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे यांनी संबंधित गॅस कंपनींच्या वरिष्ठांकडे पाठविली व कारवाईबाबत पाठपुरावा केला. गॅस कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सखोल चौकशी करून दोषी आढळलेल्या दोन वितरकांवर कारवाई केली. त्यांच्या नवीन जोडण्यांवर बंदी घातली असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. अशा बेकायदेशीर, अनियमित बाबीची आम्ही गय करणारा नाही, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जाजू, तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, तालुका सरचिटणीस सुधाकर गुंजाळ व नानासाहेब खुळे, शहर सरचिटणीस दिनेश सोमाणी व सुदाम ओझा, प्रसिद्धीप्रमुख शिरीष मुळे, सीताराम मोहरीकर, दीपक भगत, दीपेश ताटकर, दिलीप रावल, किशोर गुप्ता, शिवकुमार भांगीरे, भारत गवळी, जग्गू शिंदे, राहुल भोईर, सुनील खरे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)