संगणक प्रशिक्षण अनुदान मंजुरी पत्र प्रदान

आळेफाटा- राजुरी- बेल्हे जिल्हा परिषद गटातील विद्यार्थीनींना जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते संगणक प्रशिक्षण अनुदान मंजुरीची पत्रे प्रदान करण्यात आली. संगणक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत 3800 रूपये अनुदान देण्यात येते. निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सुनिता घोडे, उपसरपंच सुवर्णा गाडगे, रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश तिकोने, माऊली मुळे, नाजीर चौघुले, रामदास गाडगे, गोविंद गाडगे, योगेश गाडगे, योगेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांडुरंग पवार यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)