संगणक टायपिंग परीक्षा ‘अपडेट’ व्हावी

राज्य परीक्षा परिषदेच्या समितीची शिफारस


गुणपध्दतीतही बदल करण्याच्या सूचना

पुणे- राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या संगणक टायपिंग परीक्षेत काळानुसार अपडेट होत वेळोवेळी बदल करणे गरजेचे असल्याची शिफारस परिषदेने नेमलेल्या समितीने केली आहे. तसेच परीक्षेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी, गुणपध्दती, मुल्यांकन आदी बाबतही बदल करण्याच्या सूचना समितीने केल्या आहेत.

राज्य परीक्षा परिषदेने संगणक टायपिंगमधील बदलाबाबत समितीची नेमणूक केली असून अशासकीय सदस्य रमेश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली असून यामध्ये परिषदेचे सहाय्यक आयुक्‍त सुरेश माळी यांच्याबरोबर आणखी चार जणांचा समावेश आहे. या समितीने नव्याने आलेल्या संगणक टायपिंग परीक्षेत नेमके कोणते बदल अपेक्षित आहेत याची माहिती दिली आहे. हा सविस्तर अहवाल परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, सध्या जी टायपिंग परीक्षा घेतली जात आहे त्यातील बाबी या 2013 च्या शासन निर्णयानुसार ठरविण्यात आल्या आहेत. त्यात आतापर्यंत अनेक नविन तंत्रज्ञान आले आहे. त्यामुळेच यामध्ये काळानुसार वेळोवेळी बदल होणे गरजेचे आहे अशी महत्त्वाची शिफारस समितीने केली आहे. त्याचराबरोबर मन्युअल टायपिंगमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सध्या संगणक टायपिंग देता येत नाही. त्यामुळे ही अट काढून त्यांनाही परीक्षा देता येईल याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

संगणक टायपिंग परीक्षा होणार आणखी सोपी
यातील महत्त्वाची बाब म्हणजे सध्या संगणक परीक्षेत जलद उतारा टाईप करण्यासाठी बॅकस्पेस व डिलिट या बटनाचा वापर केल्यास निगेटिव्ह मार्किंग होते. मात्र आता हे बंद केले जावे अशी शिफारस समितीने केली आहे. त्याचबरोबर परीक्षेतील काही ठिकाणी 50 टक्‍के उत्तीर्णची अट ठेवण्यात आली आहे. ती अट काढून ती 40 टक्‍क्‍यांवर आणण्याची शिफारसही समितीने केली आहे.

समितीने सुचविलेले महत्त्वाचे बदल
– उत्तीर्णतेची टक्‍केवारी 50 वरुन 40 वर आणणे
– काळानुसार संगणक टायिंपंगमध्ये बदल करणे
– टायपिंगचा पेपर सेट करण्यासाठी ठाराविक संस्थांनाच संधी न देणे
– संगणक टायपिंग परीक्षेवळी आयटी शिक्षकांकडून होणारे दुर्लक्ष रोखणे
– विद्यार्थ्यांना मराठी व हिंदीतील किबोर्ड उपलब्ध करुन देणे
– संगणक टायपिंगसाठी बायोमॅट्रीक्‍स हजेरी अनिवार्य करणे
– अंध विद्यार्थ्यांसाठी वेगळी संगणक टायपिंग परीक्षा घेणे
– पेपर सेट करताना काठिण्य पातळीचा विचार करावा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)