संगणक अभियंत्याची चिंचवडमध्ये आत्महत्या

पिंपरी – संगणक अभियंत्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी दहाच्या सुमारास चिंचवड मधील बिजलीनगर येथे घडली.

अभिजित रामदास मुळे (वय-38, रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. कळंब, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळे हिंजवडी मधील एका नामांकित आय टी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला आहेत. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी बिजलीनगर येथील राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)