संगणक अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

पिंपरी – महापालिकेतील संगणक अधिकारी नीळकंठ पोमण यांनी पदाचा गैरवापर करुन ठेकेदाराची निविदा भरल्याचा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला होता. या पार्श्‍वभूमीवर या घटनेची पडताळणी करण्यासाठी पोमण यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेच्या वतीने मोशी कचरा डेपोमध्ये “वेस्ट टू एनर्जी’ हा 208 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. याकरिता महापालिकेच्या वतीने ऑनलाईन निविदा प्रसद्धि करण्यात आली होती. पोमण यांनी एका भाजप पदाधिकाऱ्यासोबत बसून ठेकेदाराला मदत करण्याच्या हेतूने ही निविदा प्रक्रिया “हॅक’ केली असल्याचा आरोप आढळराव-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

-Ads-

या प्रकारामुळे महापालिकेच्या कारभाराला काळीमा फासला गेला आहे. याशिवाय संगणक अधिकारी पदाकरिता आवश्‍यक शैक्षणिक पात्रता देखील पोमण यांच्याकडे नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोमण यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)