संक्रांतीपर्यंत थंडीची लाट

नगरचा किमान पारा 5.1 अंश सेल्सिअसच्या आसपास

नगर – उत्तर भारतातील थंडीची लाट तीव्र आहे. परिणामी राज्यात देखील वेगाने थंड वारे वाहू लागले आहे. ही थंडीची लाट मकारसंक्रांतीपर्यंत कायम राहील, असा अंदाज स्थानिक हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. नगरचे बुधवारचे किमान तापमान 5.1 , तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे.

गेल्या 24 तासात विदर्भ, मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट नोंदवली गेली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात घट नोंदवली गेली आहे. परिणामी, राज्यात थंडीची लाट कायम आहे. ही लाट मकरसंक्रांतीपर्यंत राहील, असा अंदाज आहे. विदर्भात, उत्तर व मध्यमहाराष्ट्रात बुधवारी थंडीची लाट होती. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तविला होता. विदर्भात तुरळक ठिकाणी उद्या (गुरूवारी) थंडीची लाट येण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरामधील किमान तापमाची नोंद अंश सेल्सिअसनुसार पुढीलप्रमाणे ः मुंबई 17.5, रत्नागिरी 16.2, पणजी (गोवा) 18.5, पुणे 8.0, नगर 5.1, जळगाव 6.0, कोल्हापूर 15.3, महाबळेश्‍वर 13.2, मालेगाव 8.8, नाशिक 6.9, सांगली 10.1, सातारा 9.1, सोलापूर 11.2, उस्मानाबाद 11.8, औरंगाबाद 8.7, परभणी 8.4, बीड 8.9, अकोला 8.1, अमरावती 9.2, बुलढाणा 10.2, गोंदिया 8.8, नागपूर 7.1, वाशीम 10.8, वर्धा 9.2, यवतमाळ 9.4.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)