संकेतस्थळावरून आयफोन घेण्याचा मोह पडला महागात

पुणे – ऑनलाइन विक्री संकेतस्थळावरून आयफोन विकत घेण्याचा मोह एका तरुणास महागात पडला आहे. आरोपींनी तरुणास बॅंक खात्यावर 61 हजारांची रक्कम जमा करायला लावून त्याची फसवणूक केली. शब्बीर शेख (वय-24, रा. कोंढवा खूर्द) यांने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ओएलएक्‍स या संकेतस्थळावर आयफोन विकण्याची जाहिरात अपलोड केली होती. दरम्यान, सदर मोबाइलची जाहिरात पाहून फिर्यादी शब्बीर याने त्यास संपर्क साधला. आरोपीने विविध कारणे देत फिर्यादींना ऑनलाइन बॅंक खात्यावर 60 हजार 900 रुपये जमा करण्यास सांगितले तसेच पैसे घेवूनही त्यांना आयफोन न देता फसवणूक केल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव कुंभार हे करीत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)