संकष्टीनिमित्त “विघ्नहरा’च्या दर्शनाला गर्दी

ओझर -संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे 5 वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सुर्यकांत रवळे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त पांडुरंग जगदाळे, साहेबराव मांडे, प्रकाश मांडे, देविदास कवडे, ज्ञानेश्वर कवडे, बबन मांडे व ग्रामस्थ अविनाश जाधव यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
सकाळी 7 वाजता व दुपारी 12.00 वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी 8 वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी 10.30 वाजता श्री स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी, खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर बाग, चप्पल स्टॅंड, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.
सायंकाळी 7 वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत ह.भ.प दत्तामहाराज देशमुख (हिवरे बुद्रुक) यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ (शिरोली खुर्द) यांनी दिली. सर्व वारकऱ्यांना अन्नदान संभाजी दत्तात्रय बोडके (ओझर) यांनी केले. पहाटे 5 ते रात्रौ 11 पर्यंत दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. रात्रौ 10.30 वाजता शेजआरती करून 11.00 वाजता मंदिर बंद करण्यात आले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ, कर्मचारी व ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे व इतर पोलीस कर्मचारी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)