संकष्टीनिमित्त मोरया गोसावी मंदीरात गणेशभक्तांची गर्दी

पिंपरी –संकष्ट चतुर्थीनिमित्त चिंचवडगावातील श्रीमान महासाधू मोरया गोसावी समाधी मंदीरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी भाविकांच्या पहाटेपासूनच मंदीरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.

चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदीर हे जागृत देवस्थान असल्याने दर दिवशी दर्शनासाठी शेकडो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. संकष्टी चतुर्थी निमित्तही शनिवारी (दि.27) भाविकांनी मंगलमुर्ती वाड्यात तसेच मोरया गोसावी मंदीरात दर्शऩासाठी गर्दी केली होती. यावेळी बाहेरगावहून देखील दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी बाप्पाचे दर्शऩ घेतले. पहाटेला आरती, अभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी मंदिरात देउळ मळा पटांगणापासून ते प्रवेशद्वारापासून लांबच लांब रांगा होत्या. यावेळी भाविकांनी प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी, तसेच केळी व पेढे वाटले. रात्री उशिरापर्यंत मंदिरात अबालवृध्दांनी मनोभावे दर्शन घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चतुर्थींनिमित्त भरवण्यात येणाऱ्या यात्रेत यावेळी भाविकांनी उत्साहात खरेदी केली. यावेळी उपवासाचे पदार्थांसह भाविकांनी चमचमीत पदार्थांवर ताव मारला. तसेच गृहोपयोगी वस्तू, कपडे व आवश्‍यक वस्तूंची भाविकांनी खरेदी केली. यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुक वळवण्यात आली होती. मंगलमुर्ती वाड्यातही भाविकांनी उशिरापर्यंत दर्शन घेतले. चंद्रोदयानंतर भाविकांनी दिवसभर केलेल्या उपवासाची सांगता केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)