संकष्टीनिमित्त ओझरला 50 हजार भाविक

ओझर -संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी सुमारे पन्नास हजार भाविकांनी येथील श्री विघ्नहर गणपतीचे दर्शन घेतले, भाविकांनी पहाटे पासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त होती.
पहाटे पाच वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी यशवंत कवडे, विश्वस्त बाळासाहेब कवडे, विक्रम कवडे, प्रकाश मांडे, पी. बी. जगदाळे, बबन मांडे, देविदास कवडे यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी 7 व दुपारी 12 मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी 8 नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी 10.30 वाजता श्रींस नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग व दर्शनरांगेवर ऊन व पावसापासून संरक्षणासाठी आच्छादन, शुद्ध पिण्याचे पाणी, खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर बाग, चप्पल स्टॅण्ड, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.
सायंकाळी 7 वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत हभप दत्तात्रय महाराज देशमुख हिवरे बुद्रुक यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ शिरोली खुर्द यांनी दिली. सर्व वारकऱ्यांना अन्नदान भालचंद्र विनायक रवळे यांनी केले. महाप्रसादाचे देणगीदारामध्ये कै. शीतल मोहन कवडे यांच्या स्मरणार्थ, मोहन किसन कवडे ओझर तर रशिता बेन पियुषभाई सयानी सुरत गुजरात यांनी प्रत्येकी एकविस हजार रुपये दिले. रात्री 10.30 वाजता शेजआरती करून 11 वाजता मंदिर बंद करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)