संकल्प विद्यालयात “स्मार्ट क्‍लास रुम’

  • वार्षिक स्नेहसंमेलन : विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी

पवनानगर – येथील संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संकल्प इंग्लिश मीडियम शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरा करण्यात आला. शाळेत नव्याने तयार करण्यात आलेल्या “स्मार्ट क्‍लासरुम’चे उद्‌घाटन करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे उद्योजक अशिष वैद्य, तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पाटबंधारे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, पुणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, चंद्रकांत चोक्‍सी, रसिकभाई दोशी, कांतीभाई दोशी, गणेश गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष विजय कालेकर, सचिव लक्ष्मण भालेराव, सरंपच वैशाली आढाव, उपसरपंच संजय मोहोळ, डॉ. संजय चौधरी, निती संगरजिका, प्रीती यसूफ, अशोक शेडगे, सुवर्णा राऊत, अरिफ तांबोळी, अंकुश सोनवणे आदी उपस्थित होते.

शाळेतील नव्यानेच तयार करण्यात आलेल्या “स्मार्ट क्‍लास’रुमचे उद्‌घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच चंद्रकांत चौक्‍सी, निती संगरजिका, प्रीती यसुफ यांच्या वतीने देण्यात आले. सात ई-लर्निंग किट, रोटरी क्‍लबच्या वतीने देण्यात आलेले हंडवाश सिस्टीम देखील शाळेला देण्यात आली. शाळेतून देण्यात येणारा “स्टुडंट ऑफ इयर’ हा पुरस्कार सातवी विद्यार्थिनीं पायल भोसले, तर “टीचर ऑफ द इयर’ हा पुरस्कार शिक्षक कैलास येवले यांना देऊन सन्मानीत करण्यात आले. पवनानगर येथील प्रसिद्ध डॉक्‍टर आणि संस्थेचे संचालक यांनी “स्टुडंट ऑफ इयर’ मिळवाणाऱ्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी दरवर्षी 25 हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले.

या वेळी विद्यार्थ्यांनी हिंदी, इंग्रजी, मराठी गाण्यावर नृत्य सादर केली. तसेच शहीद जवानांच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या कार्यक्रम पाहून प्रेक्षक भावूक झाले होते. तसेच यावेळी विविध शालेय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्तविक सचिव लक्ष्मण भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन दिनेश परचंड यांनी केले. श्‍वेता कालेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्यासह नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, संध्या शिंदे, आकश भालेराव, ऐश्‍वर्या बुटाला, सूरज अडसूळ यांनी प्रयत्न केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)