संकल्प छंदाचा, सकारात्मक जगण्याचा

2018 ला निरोप देताना, प्रत्येक व्यक्‍तीला म्हणता येणार नाही पण काहींना वर्ष अखेर आढावा घ्यायची सवय असते, नवीन वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या संकल्प पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल झाले का? काय खास घडले या वर्षात याचा हिशोब मांडताना त्यात जमेच्या बाजू, सकारात्मक जास्त दिसले, बघितले तर आनंदच होतो, तसेच काहीसे माझेही झाले.

याच वर्षाने मला प्रभातमध्ये विविध विषयांवर लिहायची संधी दिली. माझ्या लेखणीला प्रभातपुष्प म्हणून प्रभातने जो मान दिला, अस्मितासाठी लिहिताना जो आनंद दिला तो माझा या वर्षीची सर्वात सुंदर आठवण आहे, ते वाचताना तुम्हाला, मला जे समाधान मिळाले ते माझे पुन्हा एकदा सगळं नकारात्मकता विसरून दिलासा देणारे आहे, त्यात मी विविधता आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखंडित लेखन जमले नाही, शेवटी काय लेखाचे लेखकाचे मूड आणि परिस्थिती नुसार होऊ शकते, यातून सातत्य किती महत्त्वाचे हे मी शिकले तर बऱ्याच त्रुटी ज्या इतर कार्यक्रम असो की उपक्रम की सामाजिक कामं यातूनही अनुभवले, याच वर्षात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या, काही मुलाखती काही अंकातील लिखाण यांना प्रसिद्धी मिळाली हेही नसे थोडके असे आम्हाला वाटणे साहजिकच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यासारख्या दिग्गज साहित्यिक आणि प्रचंड बुद्धिवादी लोकांसमोर ज्यांचा मला नितांत आदर आहे, यातूनही आम्ही आमचे चार दोन शब्द उतरवतो हेच आमचे भाग्य म्हणावे. असेच काहीसे तुमचेही झाले असणार, अनेक नकारात्मक गोष्टी घडल्या, प्रचंड मनस्ताप देणाऱ्या असतील काही दुःखी घटना पण त्यावर आपल्या या छंदाने मात करावी याचसाठी पूजनीय पु .ल. म्हणून गेलेले वाक्‍य आठवले, पु. ल. देशपांडे म्हणतात, आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हला सांगतो, उपजीविकेसाठी आवश्‍यक असणाऱ्या जगण्याचे शिक्षण अवश्‍य घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका, साहित्य, चित्र, खेळ शिल्प यातील एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा, पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल.

खरेच! किती सुंदर विचार! असेच आपण आपल्या छंदाशी मैत्री केली की ते जगण्याला बळ देतात, कविता असो, लेखन, व्याख्यान, चित्रकला स्वयंपाक, विणकाम, वाचन प्रवास, फोटोग्राफी की आणखी काही या तुमच्या ऊर्जाशक्ती असतात, जगायला, जगण्यावर प्रेम करायला शिकवणारे मित्र असतात, यांना तुम्ही जेवढं जिव्हाळ्याने साथ द्याल त्यांचे संगोपन, पालनपोषण कराल तेवढीच तुमची तेही साथ देतील, तुम्हाला कुरवाळायला तुमची गाऱ्हाणी एकायला तुमचे गालावर आलेले अलगद हसू टिपायला हेच साक्षी असतात, तुमच्या डोळ्यात तरळणारे पाणी टचकन तुम्ही काढत असलेल्या पेंटिंग वर लेखावर पडले की ते अलगद पुसणारे हेच सोबती असतात.

तर सांगायचं हेच की संकल्प पुरे होवोत न होवोत, छंद मात्र जोपासावेत, भरकटत जाणारे मन कुठंतरी नक्कीच आवडत्या छंदाकडे नक्कीच वळते. आता संकल्पाची जादू मात्र अनेकांना जमली आहे बरं! त्यांचे टार्गेट तेच असते त्यासाठी अहोरात्र कष्टाची तयारी आणि रियाज सराव असे विविध मेहनतीने ते पूर्ण करण्याचे कसब त्यांना माहीत असते, आपण आपल्या परीने नवनवीन शिकत राहावे जगत राहावे आनंदाने.

अशाच काही मनाला प्रसन्न ठेवणाऱ्या कलांना आत्मसात करण्याचा संकल्प करूया, कुठं सामाजिक बांधीलकी म्हणून ती कला इतरांपर्यंत पोहोचवण्याचा मानस करूया जीवनातला आनंद असा साजरा होताना सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाला बजावून सांगूया, हे! तू मला तेवढं बळ, शक्ती, प्रेरणा, आरोग्य दे, मला सुंदर काही नवीन वर्षात करायचंय, माझ्यासाठी इतरांसाठी आनंददायी सकारात्मक असे, भव्यदिव्य नसेल पण नक्कीच समाधान देणारे असेल, तर चला एकमेकांना शुभेच्छा देऊया

संकल्पाचे ओझे न बाळगता,
सहजपणे पूर्णत्वास आणण्याचा,
थोडासा तरी प्रयत्न करूया
शुभेच्छा भरभरून घ्या
एका काव्यवेड्या सखीच्या!

– वृषाली वजरीनकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)