संकलित चाचणी दोनचे गुण सरलमध्ये भरले जाणार नाहीत

विद्या प्राधिकरणाचे स्पष्टीकरण : शिक्षकांचा जीव भांड्यात
पुणे- राज्य विद्या प्राधिकरणातर्फे घेण्यात येणारी संकलित मुल्यमापन दोनची चाचणी यंदा विविध शाळांना शालेयस्तरावर घ्यायला लावली आहे. मात्र अनेक शाळांमधील शिक्षकांना ही प्रश्‍नपत्रिका कशी काढावी, असा प्रश्‍न पडला आहे. दरम्यान या सर्व बाबी पहाता प्राधिकरणाचे या चाचणीचे गुण सरल या संगणक प्रणालीत भरले जाणार नसल्याचे सांगितले असल्यामुळे राज्यभरातील शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे.

राज्यातील खासगी शाळांसहित सर्व शाळांमध्ये संकलित मुल्यमापनाची चाचणी घेणे आवश्‍यक आहे. प्रत्येक इयत्तेतील 20 लाख अशा आठ इयत्तांमधील एक कोटी 60 लाख विद्यार्थ्यांची संकलित मुल्यमापनाची दुसरी चाचणी यंदा विद्या प्राधिकणाकडून होणार नसल्याचे सांगण्यात आले. ही परीक्षा शिक्षकांनी शालेयस्तरावर घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या. या चाचण्यांचे गुण सरल या शिक्षण विभागाच्या संगणक प्रणालीत भरले जातात. त्याद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती ठरवली जाते आणि पुढील काळात विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसारच शाळांना अनुदान देण्याच्या शासन विचारात आहे, अशी सर्व पार्श्‍वभूमी असताना जर पेपर काढावे तर, ते कसे व नाही काढले तर मुले अप्रगत दिसतील का… असा पेच शिक्षकांसमोर होता. मात्र याबाबत विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी संकेतस्थळावर जाहीर स्पष्टीकरण देत या चाचणीचे गुण सरलमध्ये भरले जाणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान ज्या शिक्षकांना आपापल्या शाळांसाठी प्रश्‍नपत्रिका काढायच्या आहेत त्यांना संकेतस्थळावर जुन्या प्रश्‍नपत्रिकाही उपलब्ध करुन दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)