संकटांना तोंड देण्याची ताकद खेळामध्ये : सरकाळे

वाई – खेळांमुळे मन आणि मनगट दोन्ही मजबूत होण्यास मदत होते. जीवनातील हार जीत पचविण्याची क्षमता खेळांमुळे तयार होते. आजच्या 21 व्या शतकात खेळाडुंना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळांकडे करिअर म्हणून पहायला सुरूवात करावी, असे प्रतिपादन, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोकराव सरकाळे यांनी केले.

येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलच्या क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी असंघटीत महिला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उषा ढवण, प्राचार्य राजकुमार बिरामणे, सौ. शोभा रोकडे, अशोक धुमाळ, मुख्याध्यापिका सौ. रेखा ठोंबरे, अमोल महांगडे आदी मान्यवर उपस्थित होते. अशोक सरकाळे म्हणाले, खेळाडूंना शासकीय नोकरीमंध्ये आज ठराविक जागा राखीव ठेवण्यात येतात. नॅशनल व इंटरनॅशनल स्पर्धेत खेळाडूंना सहभागी करून घेतले जाते. खेळांमध्ये गरीब, श्रीमंतीचा भेदभाव नसतो.

जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या जोरावर अतिसामान्य घरातील खेळाडू असामान्य कर्तृत्व सिध्द करून जागतिक पातळीवर चमकू शकतो.श्रीमती उषा ढवण म्हणाल्या, मांढरदेवसारख्या दुर्गम भागातील कालिदास हिरवेसारखे खेळाडू कोणत्याही सोयी सुविधा नसतानाही आज इंटरनॅशनल स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या आवडीच्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवून त्यात स्वतःला झोकून देवून प्रयत्न केल्यास यश निश्‍चित मिळते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

तद्‌नंतर श्रीफळ वाढवून कबड्डी, खो-खोच्या सामन्यांचा शुभारंभ करण्यात आला. सौ. एस. डी. धेडे यांनी सूत्रसंचालन केले. वाय. पी. धबदबे यांनी स्वागत केले. देवदत्त धेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)