सँट्रो गाडीचे देशभरातून ४० हजारावर बुकिंग्स; जाणून ‘घ्या’ नव्या सँट्रोचे फीचर्स

ह्युंडाई या ऑटो क्षेत्रातील कंपनीने आपली आयकॉनिक कार ‘सँट्रो’चे नवे मॉडेल काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल केले आहे. सध्या बाजारपेठेमध्ये सँट्रो या कारला सेलेरिओ, वॅगन आर, टाटा टिआगो सारख्या कारशी सामना करावा लागणार असला तरी देखील सँट्रोला भारतीय बाजारपेठेमध्ये मिळालेला प्रतिसाद उत्तम आहे. २०१८च्या या ‘सँट्रो’ कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

इंजिन : सँट्रो २०१८ मॉडेलमध्ये १०८० सीसीचे एप्सिलॉन १.१ लिटर इंजिन वापरण्यात आले आहे. इंट्री लेव्हल हॅचबॅक कार्सच्या दृष्टीने सँट्रोमध्ये वापरलेले इंजिन समाधानकारक आहे. मात्र स्पीड वाढविल्यानंतर इंजिनचा थोडा आवाज होण्याची शक्यता आहे.

-Ads-

एक्स्टेरियर : बाहेरून गाडीचा लूक बघायचा झाल्यास समोरील बाजूस ‘वॉटरड्रॉप’ हेडलॅम्प्स, ब्लॅक ग्रील, तर मागील बाजूस हेडलॅम्प्स आणि थोडासा बाहेर आलेला बम्पर यांमुळे सॅंट्रोचे हे नवे मॉडेल बाहेरून ठीक-ठाक दिसते. असं असलं तरी सॅंट्रोच्या या मॉडेलमध्ये ऑलोय व्हील्स वापरले नसल्याने ती इतर गाड्यांच्या तुलनेत मागे पडताना दिसते.

इंटेरियर : सँट्रो या कारमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र तुम्ही या गाडीच्या प्रेमामध्ये पडता. कारच्या मध्यभागी वापरण्यात आलेली इन्फोइन्टरटेन्मेन्ट सिस्टम तुमचं लक्ष वेधून घेते. इन्फोइन्टरटेन्मेन्ट सिस्टीमच्या दोन्ही बाजूस एसीचे व्हेंट्स दिले आहेत. दोन्ही दरांजवळ असणाऱ्या एसी व्हेंट्सला देखील आकर्षक आकार देण्यात आला असून मागील बाजूच्या आसनांसाठी देखील एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. गाडीमध्ये बूटस्पेस देखील चांगला देण्यात आला असून मागील बाजूच्या आसनांवर बसने आरामदायी आहे.

एकंदरीतच सँट्रोचे २०१८ चे हे नवे मॉडेल ३.९ लाखाच्या किमतीमध्ये एक ‘व्हॅल्यू फॉर मनी’ पॅकेज आहे अर्थात जर तुम्ही काही ड्रॉ-बॅक दुर्लक्षित केले तर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)