श्‍वान शर्यतीत परांडाचा “मास’ चॅम्पियन

पुसेगाव – श्री सेवगिरी महाराजांच्या 71 व्या पुण्यस्मरणनिमित्त पुसेगाव (ता. खटाव) येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्‍वान शर्यतीत परांडाच्या पै. माऊली गोडगे यांचा – “मास’ नावाचा तांबडा पांढरा रंगाचा नर श्‍वान प्रथम क्रमांक मिळवून अव्वल ठरला.

अत्यंत अटातट्टीच्या लढती असल्याने फायनल दुसऱ्या दिवशी मंगळवारी घेण्यात आल्या. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीप जाधव, विकास जाधव, सचिन जाधव, राजेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले या स्पर्धेत अनुक्रमे विजयी श्‍वान, श्‍वानाचा रंग व त्याचे मालक पुढील प्रमाणे. प्रदीप मंडले आटपाडीकर यांचा काळ्या रंगाचा “रुबी’, सेवागिरी प्रसन्न पुसेगावकर वाघा रंगाचा “राजमुद्रा’, संतोष मस्कर चितळीकर यांचा “वॉन्टेड’, आनंदा शिंदे आसुर्लेकर यांचा “सेंच्युरी’, तानाजी वलेकर उंबरमळेकर यांचा “लक्ष्मी’, सुमित वलेकर उंबरमळेकर यांचा “व्हाईट धडक’, आकाश जाधव पुसेगावकर यांचा दुर्गा, बिग ब्रदर ग्रुप कलेढोन, पुसेसावळी, अंतवडीकर यांचा सुब्रो, डायना रेसिंग क्‍लब शामगाव यांचा टाईम स्टार, बाबासाहेब गोडसे अकलूजकर यांचा बॅरल, ब्लु स्टार रेसिंग क्‍लब माणिकवाडी यांचा “ब्लॅक मॅजिक’, निनाई देवी प्रसन्न रेडकर यांचा “मस्तानी’, पै. हनुमंत अभंगराव पंढरपूरकर यांचा “ज्यु क्रॅश’, मराठा वॉरॉयर्स रेसिंग क्‍लब खटाव, खर्डी, खातवळकर यांचा “न्यू गेम चेंजर’ या श्‍वानांनी पुसेगाव येथे पार पडलेल्या शर्यंतीत सहभाग नोंदवत बक्षीसे पटकविली. मैदानाचे सूत्रसंचालन प्रकाशबुवा महागावकर यांनी केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)