श्रेयस तळपदे म्हणतोय, ‘माय नेम इज लखन’

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक ‘श्रेयस तळपदे’ सोनी सब वाहिनीवर लवकरच नवीन मालिका घेऊन येत आहे. यामध्ये श्रेयस तळपदे प्रेक्षकांना लखनच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘माय नेम इज लखन’ या मालिकेची कथा लखन नामक मोठ्या डॉनभोवती फिरते.त्याच्या जीवनामध्ये अचानकपणे घडलेल्या एका प्रसंगामुळे विलक्षण बदल येतो. आणि त्या बदलामुळे त्याला जीवनात कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत आताच्या जगात शक्तिशाली माणूसच तग धरून राहू शकतो असे त्याला वाटत असते. त्यामुळे या जगात जर तुम्हांला स्वतःचा टिकाव धरून ठेवायचा असेल तर तुम्ही सामर्थ्यशालीच बनायला हवे. मग त्यासाठी तुम्ही कोणताही मार्ग, त्या वेळेला योग्य वाटेल अशी कोणतीही पद्धत अवलंबली तरी हरकत नाही. आपले जीवन आपण कसे जगावं याबद्दल स्वतःच्या वडिलांबरोबर त्याचे मुलभूत मतभेद होत असल्याचेच या मालिकेत दिसून येणार आहे. मात्र, शाळेत शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांच्या नियमांच्या चौकटीत काही गोष्टी बसत नसतात.आपल्या मुलाने आपल्यासारखेच सदाचारी आचरण ठेवावे अशी त्यांची अपेक्षा असते आणि हेच त्यांच्यामधल्या संघर्षाचे मुख्य कारण असते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)