पुसेगाव ः सुनिल जाधव याच्या सत्कारप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक.

पुसेगाव, दि. 29 (प्रतिनिधी) – येथील श्री हनुमानगिरी ज्युनिअर कॉलेजचा सुनिल विलास जाधव 17 वर्षे वयो गट 50 किलो वजन गटात ग्रिको रोमन कुस्ती स्पधेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर भागवत आबा कापसे, ओंकार शामराव माने, व्दितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सुनील जाधवची निवड भुईंज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पधेसाठी निवड झाली आहे. क्रीडा शिक्षक संजय जाधव यांचे त्यास मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विश्वनाथराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव डॉ. सुरेशराव जाधव, विश्वस्थ मोहनराव जाधव, सर्व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य डी. पी. शिंदे, पर्यवेक्षक श्रीधर जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पुसेगाव व पुसेगाव पंचक्रोशीमधील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)