श्री सिध्दनाथाच्या उत्सवासाठी म्हसवड येथे लाखो भाविक

सिध्दनाथाच्या नावानं चांगभल च्या जयघोषात दुमदुमली माणगंगा

म्हसवड दि. 8 (प्रतिनिधी)- “”सिध्दनाथाच्या नावानं चांगभल ”,”” जोगूबाईच्या नावानं चांगभल ” च्या जयघोषात येथील श्री सिध्दनाथ-जोगेश्वरी रिंगावण यात्रा गुलाल खोब-याची उधळण करत ,; लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाली.

-Ads-

महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणा-या म्हसवडच्या श्री सिध्दनाथ यात्रेत पाच लाखाच्यावर भाविक सहभागी झाले होते. यावेळी रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने ,श्रीमंत गणपतराव राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, श्रीमंत तेजसिंह राजेमाने,श्रीमंत दिपसिंह राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने, श्रीमंत विश्वजित राजेमाने, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, नगराध्यक्ष तुषार विरकर,नगरसेवक संग्राम शेटे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार बाई माने,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल वडनेरे , माजी नगराध्यक्ष विजय धट, मुख्याधिकारी पंडित पाटील, युवराज सूर्यवंशी , विशाल बागल,अैड निसार काझी, पालिकेचे अभियंता चैतन्य देशमाने,संतोष महाजन, बाळासाहेब पिसे, लुनेश विरकर, बी एम अबदागिरे, शिवदास केवटे, प्रशांत दोशी आदी उपस्थित होते. श्री सिध्दनाथ रथोत्सवानिमित्त पहाटे पासूनच भाविकांनी गर्दी केली होती

रथोत्सवाच्या आदल्या दिवशी आमावस्येला भाविक नगरात दाखल होत आसतात परंतु यावेळी ही आमावस्या दोन दिवसात विभागली असल्यामुळे दोन दिवस अगोदरच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाली होती. यामुळे शहरातील वातावरण उत्साहाचे होते.या यात्रेसाठी दोन दिवस आगोदरच व्यापारी व भाविकांनी रांग लावली होती. रथाचे मानकरी म्हसवडचे राजे श्रीमंत राजेमाने घराण्यातील मान्यवरांनी मंदिरात जाऊन श्री सिध्दनाथाचे दर्शन घेतले. मुख्य सालकरी सिध्दनाथ गुरव (गुरव) यांच्या घरी मुर्तीची काकडपुजा करून मुख्य मुर्तीवर मंदिरात अभिषेक करण्यात आला. नंतर राजेमाने कुटूंबीय सालकरी व मानकरी यांनी श्रीची मुर्ती पालखीत ठेवली. माळी समाजातील मानकऱ्यांनी ही पालखी लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीच्या जयघोषात रथापर्यंत नेण्यात आली. श्रीच्या मुर्ती रथात विराजमान होताच. गुलाल आणि खोबऱ्याच्या वर्षावात ढोलताशांच्या गजरात दुपारी 2 वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला. गुलाल खोबऱ्याच्या वर्षावात भाविकांनी रथावर निशाण लावले. यावेळी कराड, कालगावं, ढेबेवाडी, जांभूळणी, शिराळा येथिल मानाच्या सासन काठ्यांच्या भेटीचा कार्यक्रम माण नदीपात्रत झाला. यावेळी माळी, सुतार, लोहार या मानकऱ्यांनी रथ ओढला रिंगावण पटांगणातील रथगृहा पासुन मिरवणूक माण नदीपात्रातुन बसस्थानक मार्गे वडजाई ओढ्यातुन मुळ ठिकाणी आणण्यात येते. नदीपात्रात ठिकठीकाणी लाखो भाविकांनी रथावर गुलाल खोब-याची उधळण केली . तर नवसाच्या नारळाचे तोरण देवाला अर्पण केले. वडजाई ओढ्याजवळ श्री वडजाई देवीस पारंपारिक पध्दतीने साडीचोळीचा मानपान करण्यात आले. भाविकांच्या सुरक्षेसाठी सुचवलेल्या उपाययोजनांची काही प्रमाणात पुर्तता केल्यामुळेच मंदिर परिसरातील गुलाल खोबऱ्याची व प्रसादाची दुकाने गेली दहा वर्षापासुन बंद केल्यामुळे मंदिर परिसरात चेंगराचेगरीता प्रश्न बऱ्याच अंशी सुटला आहे . तसेच हत्तीसमोर वाढवण्यात येणारे श्रीफल आणल्याशिवाय वाढवला जाणार नाही अशी देवस्थान ट्रस्टने केलेल्या उपाययोजनामुळे मंदिराच्या आवारामध्ये भाविकांची मोठ्या संखेने गर्दी असतानाही शांततेत प्रत्येकाला देवदर्शन करता आले.राज्य परिवहन मंडळाच्या सातारा, सोलापूर, आटपाडी, सांगली, विटा, कराड, बारामती, येथुन भाविकांसाठी जादा एस्‌. टी. बसेसची सोय करण्यात आली होती तर खाजगी वाहनानेही यात्रेकरू आले होते.

लाखो भाविकांच्या उपस्थितीत माण नदी पात्र व म्हसवड शहर गुलालाने गुलाबी झाले होते.यावेळी रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा आहे. रथ ओढण्याचा मान माळी समाज व बारा बलुतेदारांचा आहे.
या यात्रेवर नोटा बंदीचा परिणाम दिसून आला असुन 1000 व 500 रुपांच्या नोटा व्यवहारातून बंद झाल्यामुळे तर नविन 2000 रुपयांची नोट सुट्टे होत नसल्याने गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी व्यापाऱ्याच्या व यात्रेकरूंच्या धंद्यावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

 

यावेळी माणचे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर,अंकुश अबदागिरे , माण तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा पोरे, सुनिल पोरे, राष्ट्रवादीच्या माण तालुका सरचिटणीस सौ. गितांजली शेटे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ. वैशाली गोंजारी, नगरसेवक अकील काझी, प्रा. विश्वंभर बाबर,नगरसेविका सौ शोभा लोखंडे, बाबासाहेब माने, ऍड. शिवाजी तरटे आदींनी उपस्थितीत राहुन रथावर अरूढ झालेल्या श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेतले.

यावेळी यात्रा कालावधीत रथोत्सवाच्या आगोदर दोन दिवसा पासुन भाविकांसाठी माण खटावचे नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे दोन पाण्याचे टॅंकर व एक रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. या टॅंकरमुळे यात्रेतील भाविकांची पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाली.

यावेळी दैनिक प्रभातच्या सिध्दनाथ यात्रा पुरवणीचे प्रकाशन रथाचे मानकरी व म्हसवड चे राजे श्रीमंत अजितराव राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, अैड निसार काझी, संतोष महाजन, दै. प्रभात चे जाहिरात प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, दै. प्रभात चे म्हसवड प्रतिनिधी नागनाथ डोंबे आदीच्या उपस्थितीत करण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)