श्री साईबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

मंचर – शेवाळवाडी-गवळीनगर (मंचर) येथे श्री साईबाबा मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि. 2) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे, अशी माहिती योगेश थोरात यांनी दिली. साईबाबांचा सकाळी 8 ते 10 अभिषेक, सायंकाळी 5 ते 7 हभप विनोदाचार्य उत्तम महाराज बढे (आळंदी देवाची) यांचे कीर्तन होणार आहे. 8 वाजता उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होईल. साई संगीत भजन मंडळ हिवरेतर्फे नारायणगाव, कळंबादेवी प्रासादिक भजनी मंडळ- शेवाळवाडी यांचा कार्यक्रम होईल. कीर्तनासाठी साथ हभप गौतममहाराज जाधव, राजूमहाराज यादव, भरतमहाराज काळे, ज्ञानेश्वरमहाराज नांदेडकर, नामदेवमहाराज रौंदळ, दत्तामहाराज हजारे, उद्धवमहाराज अटाळीकर, संदेश महाराज वाळुंज, वामनमहाराज थोरात यांची उत्कृष्ट साथ कीर्तनासाठी लाभणार आहे, असे अनुप थोरात,ओंकार थोरात यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)