श्री समर्थ विद्यालयाचे दोघे जिल्हास्तरावर

चिंबळी- तायक्वांदो या कराटे क्रीडा स्पर्धेत चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्त आठवीतल दोन विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुर्वण पदाकाला गवसी घातल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा परिषद अधिकारी कार्यालय व खेड तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्‍त विद्यमानाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या त्यात सम्भय गुजर व साहिल घाडगे यांनी सुर्वण पदक पटकावल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक प्रशांत तांबे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे, प्राचार्या अनिता टिळेकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)