“श्री समर्थ’मध्ये हुताम्यांसह शिवाजी महाराजांना अभिवादन

चिंबळी – चिंबळी फाटा (ता. खेड) येथील श्री समर्थ इंग्लिश मीडिय स्कूल व कॉलेजमध्य शहीद दिनानिमित्ता भगत सिंग, राजगुरू व सुखदेव या हुतात्म्यांना तर शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे, प्राचार्य अनिता टिळेकर विष्णू भद्रे, अजय थोरात, पत्रकार सुनील बटवाल, श्रीकांत बोरावके आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरज सोमवंशी यांनी शिवचरित्र मुलासमोर मांडले, तर विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी शिवाजी महाराज यांच्या विषयी मनोगत व्यक्‍त करून पोवाडे सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा सुरू असल्याने यावर्षी साधेपणाने शिवजंयती साजरी करण्यात आली असल्याचे शिवाजी गवारे यांनी सांगितले. दरम्यान, कळूस येथील शाखेतही शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी फेटे बांधून भगवा झेंडा हातात घेउन “जय भवानी जय शिवराय’ या घोषणा देत गावतून रॅली काढली. त्यानंतर स्कूलमध्ये शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या. तर अभिषेक जाचक यांनी शिवव्याख्यानातून महाराजांच्या गुणांचे अनुकरण करावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)