“श्री समर्थ’मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

चिंबळी- चिंबळी फाटा (ता. खेड) श्री समर्थ इंल्गिश मीडियम स्कूल अँड कॉलेजच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिम्त्त विद्यार्थ्यांना प्रभातफेरी काढून जनजागृती केली. दरम्यान, श्रीसर्मथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतंसस्थेचे ध्वजारोहण संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे यांच्या हस्ते करण्यात आले, तर स्कुलचे व कॉलेचे ध्वजारोहण संचालक संतोष गवारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आर. एस. पी., स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तर पतसंस्थेचे संचालक संतोष गवारे यांच्या अध्यक्षेतेखाली विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये कयावतींचे प्रकार, डंबेल्स, लेझीम, कराटे नाटिकेचे सादरीकरण केले. तसेच प्राचार्य अनिता टिळेकर यांनी मनोगत व्यक्‍त केल्यानंतर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल गवारे, विष्णू भर्दे, वसंत टिळेकर, मनोहर जंबूकर, सारीका गवारे, सुनिता नाटक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता बडदे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)