“श्री समर्थ’च्या सभासदांना 10 टक्के लाभांश

  • शिवाजी गवारे : पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

चिंबळी – मागील अर्थिक वर्षात श्री समर्थ पतसंस्थेस 40 लाख रुपये नफा झाला असून लाभांश दरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 टक्‍क्‍याने वाढ करीत 10 टक्के व्याजदराने सभासदानांना लाभांश वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी दिली.
श्री समर्थ पतसंस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चिंबळी फाट (ता. खेड) येथील श्री समर्थ स्कूल येथे पार पडली. 2017-18 या आर्थिक वर्षाची आर्थिक पत्रके अहवाल सभेत सादर करण्यात आला त्यास एकमताने मंजुरी मिळाली. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी सभासद उपस्थिती संख्येत वाढ झाली आहे. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा विभागणीस, अंदाजपत्रकास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली, असे गवारे यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे आधारस्तंभ संभाजी गवारे, संचालक सचिन गवारे, सुधीर मुऱ्हे, राजु कड, उपाध्यक्षा सुरेखा गवारी, संचालिका नंदा येळवंडे, संचालक सुशिलकुमार पाटिल, सल्लागार भगवान साकोरे, कैलास येळवंडे, रोहिदास गवारे, बाबुराव गवारे, राजु सस्ते, ज्ञानेश्‍वर आरगडे, ज्ञानेश्‍वर ठाकुर, पै. रविंद्र गवारे, भरत करपे, ऍड. मनोहर जंबुकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवाजे गवारे म्हणाले की, श्री समर्थ पतसंस्थेत 21 कोटीच्या ठेवी असुन 16 कोटीचे कर्जवाटप केले आहे. संस्थेची झालेली ही वाढ केवळ संचालक, सल्लागार मंडळ कर्मचारी वर्ग यांच्यासह सभासदांनी संस्थेवर टाकलेल्या विश्‍वासामुळे आहे. यापुढे आपले असेच सहकार्य असेच राहिल्यास येणाऱ्या आर्थिक वर्षात संस्था 25 कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्‍त केला.
यावेळी संस्थेचे गुणवंत कर्मचारी अमर मोरे व राधा डाळींबे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 10 वी 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल सार्थक गवारे, सायली गवारे व अक्षदा एलभर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सभेच्यावेळी पुणे जिल्हा सहपतसंस्था फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी सभासद प्रशिक्षण घेतले. यावेळी संस्थेचे शासकीय लेखापरिक्षक अभिजीत काळे व विशेष वसुली अधिकारी प्रवीण थिटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक अमोल गवारे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)