श्री श्री रविशंकर यांना ‘आंतरराष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार’ प्रदान

लॉस एंजलिस :  आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांना लॉस एंजलिस येथील म्युझियम ऑफ टॉलरन्स येथे सुप्रसिद्ध ‘सिमोन विसेन्थल सेंटरचा ‘आंतरराष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. देणग्या, इंटरफेथ संबंध आणि लोकांमध्ये सहिष्णुता वाढविण्यासाठी कार्य केल्याबद्दल. आत्मसन्मान, आंतरधर्मीय सलोखा आणि लोकांमधील सहिष्णुता भाव वाढवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल श्री श्री यांना हा पुरस्कार देण्यात आला.  यापूर्वी कॅनडाचे माजी पंतप्रधान, स्टीफन हार्पर व टॉम क्रूझ हे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

श्री श्री रविशंकर हे केवळ एक मित्र नाही तर दहशतवादाशी लढा देण्यात आणि सहिष्णुतेची शिकवण देण्यात आमचे भागीदारही आहेत, असे मत यावेळी मानवी हक्क संस्थेचे असोसियेट डीन, रब्बी अब्राहम कूपर यांनी व्यक्त केले.

-Ads-

या सोहळ्यात कॅलिफोर्निया मधील २८ शहरांमधील अनेक शासकीय अधिकारी, कॉंग्रेस सदस्य, अनेक महापौर आणि परिषद सदस्य तसेच जपान, स्वीडन, म्यानमार, ब्राझील, मेक्सिको, जर्मनी, नेदरलंड, स्वित्झर्लंड, अझार्बेजान, इटली, क्रेझ रिपब्लिक आणि टर्कीचे राजदूत उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)