श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक

अकलूज- माळशिरस तालुक्‍यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 39 उमेदवारांनी 21 जागांसाठी 41 अर्ज दाखल केले आहेत. उद्या (दि. 26) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था आणि पणन संस्था प्रतिनिधी गटातून माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तीन, तर महिला राखीव प्रतिनिधी गटातून पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माळशिरस उत्पादक गटातून मिलींद कुलकर्णी, सुरेश पाटील, धोंडीराम नाळे , पोपट निंबाळकर, रामचंद्र गोरे आणि जनार्दन शिंदे , इस्लामपूर उत्पादक गटातून रामदास कर्णे, दत्तात्रय रणनवरे , अमित माने आणि बबुताई पवार, नातेपुते उत्पादक गटातून सुधाकर पोळ, सुरेश मोहिते, शहाजीराव देशमुख, सोपानराव माने आणि अजिनाथ राऊत, फोंडशिरस उत्पादक गटातून चंद्रकांत शिंदे, दत्तू वाघमोडे, संजय कोरटकर, विलास आद्रट, हिराबाई पाटील, संजय दाभाडे, मिलिंद दाते आणि सुनील माने, बोरगाव उत्पादक गटातून भगवान मिसाळ, दत्तात्रय चव्हाण, सचिन तोडकर आणि बलभीम पाटील, अनुसूचित जातीजमाती प्रतिनिधी गटातून लक्ष्मण मिसाळ, अर्जुन धाइंजे आणि लक्ष्मण ढोबळे, महिला राखीव प्रतिनिधी गटातून श्रीमती मोहिते पाटील, मीनाक्षी सावंत आणि अलका पाटील, इतर मागासवर्गीय जाती प्रतिननिधी गटातून गोपाळ गोरे, शिवाजी गोरे आणि जनार्दन शिंदे, भटक्‍या विमुक्त जातीजमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून सुनील माने यांनी अर्ज दाखल केला आहे .
खासदार विजयसिंह मोहिते पाटील गटातून 27, माजी मंत्री स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील गटातून 13, तर विरोधी सालगुडे-पाटील गटातून एक असे 21 जागांसाठी 39 उमेदवारांनी 41 अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे दाखल केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)