श्री शंकर सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी

7040 मतदानापैकी 5481 मतदारांनी मतदानाचा बजावला हक्क

अकलूज- श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सदाशिवनगर निवडणुकीत 77.86 टक्के मतदान झाले असून, मंगळवारी (दि. 27) माळशिरस येथे मतमोजणी होणार आहे. वजयसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस येथील महसूल भवन येथे सोसायटी मतदार संघामध्ये मतदानाचा हक्क बजावला, तसेच विरोधी गटातील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, पद्मजादेवी मोहिते पाटील आणि धनश्री मोहिते पाटील यांनीही मतदान केले.
आज (दि. 26) मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून 35 मतदान केंद्रावर 7 हजार 40 मतदारांपैकी 5 हजार 481 मतदारांनी मतदान केले. दुपारी 12 वाजेपर्यंत बहुतेक मतदान केंद्रावर 50 टक्के मतदान झाले होते. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 21 जागांसाठी 43 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मंगळवारी (दि. 27) माळशिरस येथील शासकीय गोदात सकाळी आठ वाजता मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटुळे यांनी सांगितले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)