श्री लक्ष्मी कृपा बॅंकेच्या उपाध्यक्षपदी सुरेंद्र दांगट

पुणे – कोथरुड येथील श्री लक्ष्मी कृपा बॅंकेच्या उपाध्यक्षपदी सुरेंद्र दांगट यांची संचालक मंडळाच्या सभेत एकमताने निवड झाली. सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक बी. टी लावंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सहकारातील अनुभव तसेच विविध क्षेत्रातील दांगट यांच्या कामाचा बॅंकेच्या वाटचालीत व प्रगतीमध्ये नक्‍कीच फायदा होईल, असा विश्‍वास बॅंकेचे अध्यक्ष ऍड. अमित निकम यांनी यावेळी व्यक्‍त केला.

-Ads-

बॅंकेचे भाग भांडवल, ठेवी व कर्ज व्यवहारात वाढ करण्यासाठी सध्या जोमाने प्रयत्न सुरू असल्याचे ही निकम यांनी यावेळी सांगितले. सध्या बॅंकेच्या दोन शाखा असून यावर्षात आणखी दोन शाखाचे विस्तारीकरण करण्यात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)