श्री रामजन्मोत्सव सोहळा इंदोरी येथे उत्साहात साजरा

इंदोरी : श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

इंदोरी, (वार्ताहर) – दुपारी बाराचा वाजता इंदोरी मावळ येथील श्री राममंदिर परिसर अयोध्यापती मर्यादा पुरुषोत्तम सियावर “रामचंद्र की जय…प्रभू श्रीराम की जय’च्या गजरात दणाणून गेला. पुष्प फुलांची उधळण करत हजारो भाविकांनी रविवारी (दि. 25) रोजी प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा केला.

इंदोरी येथील इंद्रायणी नगर येथील श्री राम मंदिरात रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्ताने भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रम घेण्यात आले. श्रीरामाच्या मूर्तीला अलंकार तसेच नवीन वस्त्रे परिधान करण्यात आले. मंदिरावर रोषणाईही करण्यात आली होती.

दि. 18 ते दि. 25 पर्यंत रोज पहाटे 5 ते 7 काकड आरती तसेच सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ नियमित होत होता. दि. 25 रविवारी रोजी सकाळी दहा वाजता कीर्तनकार ह.भ.प.माऊली महाराज खराडे यांचे “श्रीराम जन्मोत्सव’ विषयावर कीर्तन झाले. बारा वाजता हजारो भाविकांनी श्रीराम जन्मोत्सव साजरा केला.

आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी पाच ते आठ या वेळेत “श्रीं’ची सजविलेल्या रथात शोभायात्रा काढून श्रीरामाचा गजर करण्यात आला. यामध्ये महिला, पुरुष भजनी मंडळांनी सहभाग नोंदवून टाळ-मृदंगाच्या तालावर फुगड्या, पावली खेळत पालखीची शोभा वाढवली. यामध्ये श्री राम भजनी मंडळ तसेच इंद्रायणी मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)