श्री मोरया गोसावी “जीवन गौरव’ने तापकीर सन्मानित

स्वकामच्या माध्यमातून 24 वर्षांपासून अष्टविनायक, तीर्थक्षेत्रांची अविरपणे करताहेत स्वच्छता

आळंदी- यंदाचा “श्री मोरया गोसावी जीवन गौरव’ पुरस्काराने आळंदीतील स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर यांना सन्मानित करण्यात आले.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, (चिंचवड, मोरगाव, सिद्धटेक, व थेऊर) या चार संलग्न संस्था, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व समस्त ग्रामस्त चिंचवड यांचे संयुक्‍त विद्यमाने प्रतिवर्षीच्या मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्याचे औचित्य साधत समाजातील विविध धार्मिक, कला, क्रीडा, सामाजिक अशा निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी करणाऱ्या दहा ऋषीतुल्य व्यक्‍तींचा सन्मान करण्यात येतो. त्यातीलच एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अत्युच्च कार्य केलेल्या सन्मानित व्यक्तीचा “श्री मोरया गोसावी जीवन गौरव’ पुरस्कार देऊन त्या व्यक्तीस सन्मानित करण्यात येते, हा मान तापकीर यांना मिळाला.
सुनील तापकीर स्वकाम सेवा मंडळाच्या माध्यमातून गेल्या 24 वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील सर्व अष्टविनायक मंदिरांमध्ये व राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये विनामोबदला, विनाशुल्क मंदिर स्वच्छतेचे काम करीत आहेत. तसेच भाविकांना चहा, नाष्टा फराळ व देणगी पावत्या फाडण्यास मदत करतात. त्यांचे हे काम यात्राकालावधित बाराही महिने सुरू असतो त्यांच्या या कार्याची दखल घेत तापकीर यांना बुधवारी (दि. 26) मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित असा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, सचिन चिंचवडे, महिला अध्यक्षा आशा तापकीर, देवस्थांचे प्रमुख विश्‍वस्त मंदार देव, राजेंद्र उमाप, विनोद पवार, मोरेश्‍वर भोंडवेंसह स्वकामचे महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान आळंदी देवाची यांनी देखील प्रतीवर्षी कार्तिक वारीतील माउलींच्या संजीवन समाधीदिनी केवळ मानकऱ्यांना नारळ-प्रसादाचे वाटप न करता “मोरया गोसावी ट्रस्ट’च्या स्त्युत्य उपक्रमाचे अनुकरण करून आळंदी देवस्थांचे वतीने देखील प्रतिवर्षी आळंदी व परिसरातील विविध धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऋषीतुल्य व्यक्‍तींचा सन्मान करावा, अशी अपेक्षा आळंदीकरांनी व्यक्‍त केली.

  • गेली 24 वर्षांच्या अवरित सेवेत आजवर कोणत्याही देवस्थांचा जाहीर सन्मान स्विकारला नव्हता. आजच्या या सन्मानाने आमचे स्वकाम सेवा मंडळ खऱ्या अर्थाने समाजाच्या ऋणानुबंधातून उतराई झाल्याचे समाधान वाटले. हा सन्मान माझा एकट्याचा नसून, याचे सर्व श्रेय मंडळाचे संस्थापक डॉ. सारंग जोशी, विदुला जोशी, महिला अध्यक्षा आशा तापकीर व मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांचे आहे.
    – सुनील तापकीर, अध्यक्ष, स्वकाम सेवा मंडळ, आळंदी
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)