श्री मुंजोबा महाराज उत्सव आनंदात साजरा

  • पै. राजमाने यांनी मिळवला पिंपळे सौदागर किताब

पिंपळे सौदागर – येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराज उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमिताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जंगी कुस्त्यांचे आयोजनाने वातावरण खूपच उत्साही झाले होते.

सकाळ पासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सर्व परिसरात भक्तिमय वातावरण दिसून येत होते. मुख्य मंदिरासह गावातील सर्वच मंदिरावर विविध रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर अनेक प्रकारच्या फुलांनी मुख्य मंदिराचा गाभारा सजविण्यात आला होता. पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. यात राज्यातील व परराज्यातील नामवंत अशा 120 मल्लांनी सहभाग घेतला.

-Ads-

सकाळी सात वाजता श्री मुंजोबा महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. अकरा वाजता गावातील सर्व देवतांना ढोल ताशेच्या निनादात पानफुल वाहण्यात आले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले. रात्री श्री मुंजोबा महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली, टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात गाव प्रदक्षिणा घालत पालखी मिरवणूक मुख्य मंदिरात परत आली.

सह्याद्दी कुस्ती संकुलाचा (उपमहाराष्ट्र केसरी )राजेंद्र राजमाने व हरियाणाचा जग्गा पैलवान यांच्यात शेवटच्या कुस्तीसाठी लढत झाली. राजेंद्र राजमाने यांनी घिस्सा डावावर हरियाणाचा जग्गा पैलावान यास अवघ्या तीन मिनिटात चितपट करत रोख बक्षीस रुपये एक लाख व चांदीची गदा तसेच पिंपळे सौदागर किताब 2018 हा बहुमान मिळविला यासह अनेक कुस्तीगीरांनी चितथरारक कुस्त्या पार पडल्या. पैलवान अर्जुन काटे यांच्या वतीने विजेत्या पैलवानास चांदीची गदा देण्यात आली.

पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने राज्यस्तरीय कुस्ती आखाडा भरविण्यात आला होता. यावेळी वजनी गटावर व खुल्या गटात कुस्त्या घेण्यात आल्या 35 किलो, 40 किलो ,45 किलो ,50 किलो ,55किलो ,60 किलो ,65 किलो 74 किलो व खुल्या गटात आशा कुस्त्या झाली . या सर्व गटात 120 मल्लांनी सहभाग घेतला होता . सर्व कुस्त्या निकाली खेळविण्यात आल्या. विशेष म्हणजे जो मल्ल जिंकला त्याला व जो हारला त्यालाही बक्षीस देण्यात आले . या आखाड्यात महिला पैलवान अक्षदा वाळुंज हिने पैलवान श्रद्धा भोर हिला कलाजंग डावावर चितपट केले तर रितू संधू व तनुजा आल्हाट यांची कुस्ती प्रेक्षणीय झाली. महिला पैलवानांना नगरसेविका शीतल काटे, स्वाती शिवाजी काटे व अनिता संदीप काटे यांनी बक्षिसे दिली. या आखाड्यासाठी पंच म्हणून बाळासाहेब काळजे, सचिन खांदव, निवृत्ती काकडे, संतोष माचुत्रे, काळुराम कवितके तर हंगेश्वर धायगुडे यांनी उत्कृष्ठ निवेदक म्हणून कामगिरी पार पाडली.

यावेळी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारे यांचा पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच पिंपळे सौदागर ग्रामस्थ यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान कौतुक डाफळे, ज्ञानेश्वर गोचडे, आकाश माने,तसेच महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, नाथा पारगावकर, दशरथ पवार व युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, वस्ताद किसन लांडगे , राष्ट्रवादी कांग्रेसचे पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे,माजी पीसीएमटी सभापती दिलीप बालवडकर,पोलीस पाटील भगवान काटे पाटील, भरत कुंजीर, जयवंत बोडके, राजू काटे, संदीप काटे, चंद्रकांत कुटे, नामदेव आव्हाळे व परिसरातील विविध शेतंत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पंचक्रोशीतील नागरिकांनी सर्व कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात लाभ घेतला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री मुंजोबा महाराज उत्सव कमिटी व अध्यक्ष सुरेश काटे ,समस्त ग्रामस्थ पिंपळे सौदागर व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)