श्री.माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राचे शनिवारी उद्घाटन

        अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री राम शिंदे यांची उपस्थिती

संगमनेर- येथील शिक्षण प्रसारक संस्थेने मालपाणी परिवाराच्या सहयोगातून साकारलेल्या श्री.माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राचे शनिवारी  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम.शिंदे, आमदार डॉ.सुधीर तांबे व बी.व्ही.जी समुहाचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

औषधी घेऊन आजारावर केवळ नियंत्रण मिळवता येते, आजारातून मुक्ती मिळत नाही.मात्र योग व निसर्गोपचार पद्धतीने आजारातूनच पूर्णत: मुक्ती मिळवता येणे शक्य आहे. यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेने मालपाणी परिवाराच्या सहयोगातून या उपचार पद्धतीचे अत्याधुनिक केंद्र उभारले आहे. येथे तज्ज्ञ डॉयटरांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास बत्तीस प्रकारच्या व्याधींवर प्रभावीपणे निसर्गोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी विविध 20 प्रकारच्या उपचार पद्धतींचा वापर केला जाणार आहे.

महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र उपचार व्यवस्था, रुग्णांचे अभ्यासपूर्ण समुपदेशन, अनुभवी रोगोपचारतज्ज्ञ,निवास व्यवस्था, ग्रंथालय, स्वतंत्र योग व षटक्रियाकक्ष, दृकश्राव्य कक्ष,आरोग्यविषयक व्याख्याने, वॉकिंग ट्रॅक, नैसर्गिक औषधे, ध्यानधारणा प्रशिक्षण आदी सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पाठदुखी,  गुडघेदुखी, मानदुखी यासारख्या सामान्य आजारांपासून ते मानसिक ताण तणाव, हृदयरोग, अर्धांगवायू यासारख्या व्याधींवर श्री.माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्रात प्रभावी उपचार उपलब्ध होणार असल्याची माहिती निसर्गोपचा केंद्राच्या वतीनं देण्यात आली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)