श्री फौंडेशन स्विकारणार दान केलेल्या मूर्ती

आळंदी-तीर्थक्षेत्र आळंदी येथे आळंदीसह परिसरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेशाच्या मूर्ती आळंदीच्या पवित्र अशा इंद्रायणीत विसर्जित केल्या जातात.
दीड, पाच, सात दिवस व अनंत चतुर्दशीदिनी श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात येते. यावेळी लाखोंच्या संख्येने मुर्तींचे विसर्जन हे कृत्रिम हौद व इंद्रायणीत केले जाते. त्यामुळे बऱ्याच अंशी मूर्ती नदीपात्रात तशाच पडून राहतात. त्यांची विटंबना होऊ नये, यासाठी पुणे येथील सामाजिक संस्था श्री फौंडेशन यांनी त्या दान म्हणून स्विकारण्याचा पालिकेकडून विडा उचलला आहे. काल श्री गणेशाच्या पाचव्या दिवशीचे विसर्जन पवित्र अशा इंद्रायणीत करण्यात आले. यावेळी शेकडो विसर्जित गणेशाच्या मूर्ती पाण्यात बुडवून बाहेर काढण्यात आल्या. त्याचा स्विकार श्री फौंडेशनने करुन तुर्तास त्या इंद्रायणी घाटावर ठेवण्यात आल्या. अखेरच्या दिनी लाखांवर मूर्ती स्विकारण्याचा विडा यंदा श्री फौंडेशनने उचलला असल्याचे आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भुमकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)