श्री पद्मावती मंदिरात घटस्थापना उत्साहात

भुईंज, दि. 11 (वार्ताहर) – वाई तालुक्‍यातील ओझर्डे गावात अत्यंत प्राचीन हेमाडपंथी आणि लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री पद्मावती मातेच्या मंदिरात आज अश्विन शुध्द प्रतिपदेस पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधीपूर्वक घटस्थापना करण्यात आली. लाखो भाविकांचे पिढ्यान्‌पिढ्यांचे असलेले गावचे ग्रामदैवत आणि कुलदैवत असलेल्या श्री पद्मावती मंदिरासह श्री तुकाई मंदिर आणि श्री लक्ष्मी मंदिरामध्ये विधीपूर्वक पुजा, आरती करुन घटस्थापना करुन येथे नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. नवरात्रोत्सवात श्री पद्मावती देवीची गाव प्रदक्षिणेसाठी पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. मंदिरात दररोज विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच अष्टमीला रात्री होम हवणाचा विशेष विधी केला जातो. यामध्ये महिला, अबालवृध्द आणि तरुणाई, भक्तांचा मोठ्या संख्येने उपस्थिती असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)