श्री डोळसनाथ महाराज मंदिरात नेत्रदीपक दीपोत्सव

  • आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या

तळेगाव दाभाडे – येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. 22) सायंकाळी श्री डोळसनाथ महाराज मंदिरात विविध फुलांच्या आकर्षक सजावटीसह सामाजिक संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढून नयनरम्य सजावट करण्यात आली होती.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या सभा मंडपात वाऱ्याचा मारा सोसत दिवा आपली ज्योत टिकवतो. संघर्षानंतर प्रकाश असतो जणू हेच तो आपल्याला शिकवतो !! या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या रांगोळीच्या आवती भोवती तब्बल पाच हजार आकर्षक दिव्यांची आरास करून परिसर प्रकाशमान करून नयनरम्य, दिव्य व अतिशय सुंदर असा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज, “पाणी वाचवा-जीवन वाचवा’, “बेटी बचाओ-बेटी पढाओ’, “स्वच्छतेचा संदेश’, भारतीय जवानांना मानवंदना, “वारी “ती’ ची’, “पंढरीची वारी’ अशा विविध सामाजिक रांगोळ्यांद्वारे सामाजिकतेचा संदेश देण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा, असुरांचा व अंधकारमय बाबींचा नाश केला. मानवाला प्रकाशमान जीवन प्राप्त करुन दिले. या अनुषंगाने फुलांतून साकारण्यात आलेल्या भगवान शंकरांच्या पिंडीची पूजा करण्यात आली. दीपोत्सवाचे उद्‌घाटन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, संत तुकाराम साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर, वसंतराव भेगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री डोळसनाथ पतसंस्था व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने साकारण्यात आलेल्या दीपोत्सवाचे हे 3 रे वर्ष असून, या वेळी उपक्रम नगरसेवक संतोष भेगडे, डोळसनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे यांच्या समवेत नगरसेवक अरुण माने, नगरसेवक अमोल शेटे, नगरसेवक आनंद भेगडे, गणेश काकडे, दिलीप खळदे, यादवेंद्र खळदे, श्रीराम कुबेर, नगरसेविका मंगल भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, शोभा भेगडे, सुरेखा जाधव, शुभांगी शिरसाट, संध्या भेगडे, माया भेगडे, रत्नाताई भेगडे, रजनी भेगडे, नारायण ठाकर, उद्योजक कौस्तुभ भेगडे, सचिव सतीश भेगडे, उपाध्यक्ष राहुल पारगे, व सर्व संचालक मंडळ, आशिष खांडगे, सुनील गायकवाड, दिनकर भेगडे, वैभव भेगडे, नितीन भेगडे, विनोद उर्फ बंटी भेगडे, योगेश भोर, दीपेश बुट्टे पाटील व तरुण ऐक्‍य मित्र मंडळ सर्व कार्यकर्ते व तळेगावासह पंचक्रोशीत असंख्य नागरिक उपस्थित होते.

मागील दोन वर्षांपासून साकारत असलेल्या दीपोत्सवाच्या यंदाच्या तिसऱ्या वर्षीही उपक्रमाला भाविकांचा बहुमोल प्रतिसाद लाभल्याबद्दल उपक्रमाचे नगरसेवक संतोषभाऊ भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले. डोळसनाथ तालीम मित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. प्रकाश योजना व सजावट व्ही. एम. झेड डेकोरेटर्स यांनी केली होती. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. स्वागत मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)