श्री ज्ञानेश्‍वर विद्यालयाचे घवघवीत यश

आळंदी- येथील श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालातील अनुराधा खेसे यांच्या “बहुउद्देशीय वर्तुळ शैक्षणिक साहित्य’ या शिक्षक प्रकल्पास व मनीषा पवार यांच्या “लोकसंख्या शिक्षण’ या विषयांतर्गत असलेल्या प्रकल्पास माध्यमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच विज्ञान प्रदर्शनानिमित्त आयोजित प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत माध्यमिक गटात इयत्ता 10 वी मधील अंगध खराटे व आश्‍लेष घोडके या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. खेड तालुका विज्ञान प्रदर्शनात या स्पर्धा कुरुळी (ता. खेड) येथील श्री भैरवनाथ विद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेते शिक्षक, विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक गोविंद यादव, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)