श्री ज्ञानेश्‍वर विद्यालयात रंगले बालकीर्तन

आळंदी- येथील श्री ज्ञानेश्‍वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालत सांस्कृतिक विभागातर्फे बालकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अभिमन्यू महाराज आंधळे, सुनिता महाराज आंधळे, विद्यालयाचे प्राचार्य गोविंद यादव, उपमुख्याध्यापिका छाया गायकवाड, पर्यवेक्षक सिद्धनाथ चव्हाण, दीपक मुंगसे उपस्थिती होती. इयात्ता 6 वी मधील अभिषेक नाईकवाडे व इयत्ता 7 वी मधील भाग्यश्री कोथिंबीरे या विद्यार्थ्यानी कीर्तन कार्यक्रम सादर केला. त्यांनी आपल्या कीर्तनातून जीवनात प्रत्येकाला अध्यात्माची आवड निर्माण होण्याची आवश्‍यकता सांगितली. अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यानी त्यांना टाळकरी ,विणेकरी व भजनाच्या साथ संगतीसाठी सोबत केली. कार्यक्रमाचे नियोजन अनुराधा खेसे, सूत्रसंचालन अतुल भांडवलकर तर शारदा साबळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)