श्री ज्ञानेश्‍वर प्रशालेत क्रीडा सप्ताह

आळंदी- आजचे बालक हे देशाचे उद्याचे भविष्य आहे.मुले शारीरिक दृष्ट्या सक्षम असतील तर ते सर्वांगीण विकास करू शकतील व हे खेळाद्वारे शक्‍य आहे. तसेच आजकालची मुले ही मोबाइल टिव्ही यांना चिकटलेली असतात. मैदानी खेळ खेळत नाहीत परिणामी मुलां मधील स्थूलता वाढत आहे व कमी वयात अनेक व्याधी मुलांमध्ये निर्माण होत आहेत. म्हणून खेळाचे महत्त्व, सांघिक भावना, एकता या गोष्टी वाढीस लागाव्या म्हणून आळंदीतील श्री ज्ञानेश्‍वर प्रशालेत क्रीडा स्पर्धा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटपन संस्थचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, शिक्षक पालक संघाच्या उपाध्याक्षा गोदावरी बकाल, मुखाध्यापक प्रदिप काळे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, तीन पाय शर्यत, पोत्याची उडी, चेंडू वेचणे, कॅरम, अंकशिडी,मणी ओवणे आदीं खेळांनी स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. वर्षा काळे, निशा कांबळे, वैशाली मुंगसे, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण आदी शिक्षकांनी खेळाचे नियोजन केले. तर सोपान वायळ यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)