श्री जोतिबा चैत्रयात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

कोल्हापूर – दख्खनचा राजा श्री  जोतिबाच्या यात्रेला ३० मार्च रोजी प्रारंभ होणार आहे. ही यात्रा तीन दिवस असते. यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.श्री. वाडीरत्नागिरी येथील एमटीडीसी रिसॉर्ट येथे देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर श्री केदारलिंग (श्री जोतिबा) देवस्थान चैत्र पोर्णिमा यात्रा- 2018 पूर्वनियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणार खेमणार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, प्रांताधिकारी अजय पवार, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, देवस्थान कमिटीच्या सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पवार, तहसिलदार रामचंद्र चौबे, गट विकास अधिकारी  प्रियदर्शनी मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जोतिबा चैत्र पोर्णिमा यात्रा सुरळित आणि सुरक्षितपणे पार पडावी, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी तयारी पूर्ण केली असून यापुढील काळात सर्व यंत्रणांनी अधिक सज्ज आणि सतर्क रहावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, यात्रा कालावधीत जोतिबा डोंगर येथे सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून काम करावे. देवस्थान समिती, महसूल, पोलीस, आरोग्य,सार्वजनिक बांधकाम,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,अन्न औषध प्रशासन, यांच्यासह सर्व विभागांच्या माध्यमातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहे. जोतिबा डोंगर येथे प्लास्टिक बंदी, खोबरे वाटी बंदी तसेच दुकानात अग्निशमन यंत्रे बंधनकारक केल्याचे यावेळी सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)