श्री छत्रपती शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या बदल्या

संग्रहित फोटो

भवानीनगर- श्री छत्रपती शिक्षण संस्थेतील शाखामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेली 25 ते 30 वर्ष एकाच ठिकाणी काम करत होते. त्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय सध्याचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी घेऊन त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात आल्याने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून श्री छत्रपती शिक्षण संस्था 1960मध्ये अस्तिवात आली. त्यामुळे ही संस्था कारखान्याशी संलग्न आहे; परंतु त्या काळापासून काही प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या होत्या; परंतु नंतरच्या काळात श्री छत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काटेवाडी, पिंपळी, शिधेश्‍वर निंबोडी, सोनगाव, सणसर, बेलवाडी, अंथुर्णे, परीटवाडी, शिंदेवाडी, उद्धट याठिकाणी संस्थेने शाखा स्थापन केल्या. तर काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाखेच्या स्थापणे पासून त्याच शाळेत काम करीत होते. याबाबत या आगोदारही कितेकवेळा बदली काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करण्यात आली होती. परंतु शिक्षण संस्था ही श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ताब्यात असल्याने या संस्थेवर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ हेच शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ आहे. त्यामुळे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बदली केली असता इतर संचालकांच्या हस्तक्षेपामुळे बदली केलेली असतानाही पुन्हा बदली रद्द करावी लागत होती.
दरम्यान, शिक्षण संस्थेचे सध्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी इंदापूर तालुक्‍याचे आमदार दत्तात्रय भरणे, श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या समोर या सर्व शाखेतील शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा प्रस्ताव मांडला व या सर्वांच्या संमतीने या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची झालेली एकही बदली स्थगित किंवा त्यात बदल न करता बदल करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात संस्था स्थापन झाल्यापासूनच्या आजपर्यंतच्या काळात झालेल्या या बदल्या आहेत. मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले व आनंद ही व्यक्त केला.

  • स्पर्धेच्या युगात श्री छत्रपती शिक्षण संस्था ही मागे राहु नये व सभासदांची ही कायम मागणी होती. यामुळे संस्थेने हे ऐतिहासिक पहिले मोठे पाऊल उचलत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकूण 90 ते 95 बदल्या केल्या. उर्वरित बदल्या या दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असून आजूनही शिक्षण संस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व संचालक मंडळ कायम प्रयत्न करणार.
    – प्रशांत काटे, अध्यक्ष, श्री छत्रपती शिक्षण संस्था
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)